महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयाच्या, संकल्पनेतून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिनांक ६जून२०२५रोजी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याची संकल्पना पुढे ठेवली आणि त्यासाठी संस्थेतील आय एम सि सदस्य व किमान दोन वक्ते यांना पाचारण करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सुचना दिली, त्यादृष्टीने मूल येथील मा. सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूल येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेचे पूजन करुन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांना रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले, त्यानंतर स्वागतगीत गायनाने रितसर कार्यक्रम सुरु झाला.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून १) जागृत ग्राहक राजा या संघटनेचे नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे २) सामाजिक कार्यकर्त्या योगिता पेंदाम यांना पाचारण करण्यात आले होते,तर या कार्यक्रमात प्रमुख अतिथी मध्ये आय एम सि ऑफ आयटीआय मूलच्या सदस्या १) प्रा डॉ सौ किरण कापगते व २)सौ वर्षाताई परचाके प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. ए. एन. बोकारे सर्व साधारण प्राचार्य विराजमान होते.
या विचारमंचावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अव्वल सचिव यांच्या संशोधनाची व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला व आजच्या काळात त्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांची गरज व आवश्यकता पटवून देत स्वातंत्र्य स्वराज्यात परावर्तित करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करून आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याचा अंमल करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.
त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल येथील स्मार्ट क्लासरूमचे फित कापून रितसर उद्घाटन करण्यात आले,व विद्यार्थ्यांना एक डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देण्यात आली.
साधारण तीन साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीप्ती भदे मॅडम यांनी आणि प्रास्ताविक स्नेहल प्रधान मॅडम यांनी केले तर पोवाडा सादरीकरण कु. एमनुरवार, कु अंपरवार, कु. सतक मॅडम आणि सर्व ट्रेड च्या मुलींनी उत्तम रीतीने सादर केला.आभार प्रदर्शन – श्री गणेश स्वामी यांनी केले.
तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सगळ्यांना मिठाई वाटप करुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.