छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भाजपा मुल शहरच्यावतीने कार्यक्रम संपन्न
मुल (दि. ६ जून) – भारतीय जनता पार्टी, मुल शहरच्या वतीने आज दिनांक ६ जून रोजी, शुक्रवारला, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, मुल येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगण्यात आली तसेच त्यांचा आदर्श समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रसंगी भाजपा कार्यालय प्रमुख प्रवीण मोहुर्ले, अविनाश जगताप, मिलिंद खोब्रागडे, राकेश ठाकरे, श्रीमती मनिषा गांडलेवार, वंश बोबाटे, मेश्राम सर, हर्ष गांडलेवार आणि गणेश मेश्राम हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत इतर महिला कार्यकर्त्यांनी देखील कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आदरपूर्वक स्मरण करून, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प केला.